AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...

Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर…

| Updated on: Oct 16, 2026 | 7:53 AM
Share

दिल्लीत सीजेपीच्या लेहरा दो तिरंगा रॅलीआधी अभिजीत दिपके यांनी स्वतःच्या अटकेची भीती व्यक्त केली आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर ज्ञानेश कुमार यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप केला. दिपके यांनी ज्ञानेश कुमार हे प्राईम विटनेस असल्याचे सांगत, त्यांची त्वरित सुटका करण्याची मागणी केली. दिल्ली बंद करण्याच्या मुद्द्यावरूनही दिपके यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली.

दिल्लीत सीजेपीच्या वतीने आयोजित लेहरा दो तिरंगा रॅलीआधी नेते अभिजीत दिपके यांनी गंभीर आरोप केले आहेत. सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ ही रॅली काढण्यात येत आहे. दिपके यांनी आपल्याला दिल्ली पोलीस किंवा आयबीकडून अटक होण्याची भीती व्यक्त केली आहे. “घर के चारों ओर दिल्ली पुलिस और आयबी के लोगोने इस घर को सराउंड करके रखा है” असे ते म्हणाले.

यावेळी दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल केला. “ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, ज्ञानेश कुमार यांच्यासाठी संपूर्ण दिल्ली शहर ठप्प करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. रेल्वे आणि मेट्रो सेवा बंद करून दिल्लीचे इंडिया-पाकिस्तान सीमेसारखे रूपांतर करण्यात आल्याचे दिपके यांनी म्हटले. ज्ञानेश कुमार हे प्राईम विटनेस असून, त्यांना मोदी आणि अमित शाह यांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले असल्याचा दावाही दिपके यांनी केला. त्यांची तातडीने सुटका करण्याची मागणीही त्यांनी केली.

Published on: Oct 16, 2026 07:53 AM

Follow Us