Ranbir Kapoor च्या अडचणी वाढणार? ईडीनं बजावलं समन्स, काय आहे प्रकरण?
VIDEO | अभिनेता रणबीर कपूर याच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता आहे. ऑनलाईन गेमिंग प्रकरणात रणबीर कपूर या अभिनेत्याला ईडीने समन्स बजावलं आहे. ६ ऑक्टोबर रोजी रणबीर कपूरला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काय आहे नेमकं प्रकरण?
मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३ | बॉलिवूड विश्वातील अभिनेता रणबीर कपूरला ईडीने आज समन्स बजावलं आहे. त्यामुळे या अभिनेत्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एका ऑनलाईन गेमिंग प्रकरणात हे समन्स बजावण्यात आले आहे. महादेव गेमिंग अॅप्लिकेशन जाहिरातीत हा अभिनेता संबंधित अॅप्लिकेशनचं प्रमोशन करत होता. दरम्यान, ६ ऑक्टोबर रोजी अभिनेत्याला चौकशीकरता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. अभिनेता रणबीर कपूरला ईडीने समन्स बजावल्यानंतर रणबीर कपूरच्या चाहत्यावर्गात नाराजीचं वातावरण आहे. मात्र ६ ऑक्टोबर रोजी अभिनेत्याची चौकशी होणार आहे. त्यामुळे नेमकं आता पुढे काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. ईडीनं समन्स बजावल्यानंतर अद्याप अभिनेता रणबीर कपूरने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे दिसतंय.

कोट्यवधी रुपयांची भेटवस्तू देणारी माणसं

3 वेळा अपयश, अगदी मुलाखतीत स्वप्न फिस्कटलं, पण चौथ्यांदा IPS

फक्त बॉलिवूड नाही, शिक्षणातही 'या' अभिनेत्रींनी बाजी मारलीय

ऋतुराजने केएल राहुलचा विक्रम मोडला, काय ते वाचा

तुम्हीही फ्रीजमध्ये ठेवलेले अंडे खाताय तर सावधान

न्यासा देवगन परदेशात शिकतेय; फी ऐकून अवाक् व्हाल
Latest Videos