Nora Fatehi | अभिनेत्री नोरा फतेहीची EDकडून 4 तासांपासून कसून चौकशी सुरु

दिल्लीच्या तिहार कारागृहात बंद असलेल्या सुकेश चंद्र शेखरच्या 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीला (Nora Fatehi) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स जारी केले आहे. या समन्सनंतर नोरा फतेही दिल्लीस्थित ईडी कार्यालयात दाखल झाली असून तिची चौकशी करण्यात येत आहे.

दिल्लीच्या तिहार कारागृहात बंद असलेल्या सुकेश चंद्र शेखरच्या 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीला (Nora Fatehi) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स जारी केले आहे. या समन्सनंतर नोरा फतेही दिल्लीस्थित ईडी कार्यालयात दाखल झाली असून तिची चौकशी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसलादेखील समन्स जारी करण्यात आलं आहे.

नोरा फेतही तसेच जॅकलीन फर्नांडिसचीही फसवणूक

सुकेशवर नोरा फतेहीचीच नव्हे, तर अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचीही फसवणूक केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणाशी निगडित चौकशी करण्यासाठी नोराला दिल्ली ईडने बोलावले आहे. सध्या नोरा ईडीच्या दिल्ली येथील कार्यालयात पोहोचली आहे. या प्रकरणी तिच्याकडून काही माहिती विचारण्यात येत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI