Ahmednagar | गटविकास अधिकाऱ्याला शिवीगाळ, मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी; पोलिसात गुन्हा दाखल

श्रीगोंद्याच्या गटविकास अधिकारी यांच्या दिशेने नाहटा यांनी पायातील बूट भिरकवला. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नाहटा यांना पोलिसांनी अटक केली आहे. (Ahmednagar Shrigonda BDO abusing beating and threatening to kill)

श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकणाथ  ग्रामपंचायतच्या माध्यमातून १४  व्या वित्त आयोगातून अनेक कामे विनापरवाना केले असल्याची तक्रार गावातील नागरिकाने केली असता याबाबत गटविकास अधिकारी चौकशी अहवाल सादर करत असल्याची माहिती बाळासाहेब नाहटा यांना मिळताच नाहटा यांनी गटविकास अधिकारी यांच्याशी किरकोळ बाचाबाची केली तरीही गटविकास अधिकारी हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने नाहटा यांचा राग अनावर झाला आणि बाहेर निघालेल्या गटविकास अधिकारी यांच्या दिशेने नाहटा यांनी पायातील बूट भिरकवला. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नाहटा याना पोलिसांनी अटक केली आहे