Air India Plane Crash : एअर इंडियाचं विमान अहमदाबादेत कसं कोसळलं? नेमकं काय घडलं? किती होते भारतीय प्रवासी?
अहमदाबाद येथे एअर इंडियाचे एक विमान अपघातात कोसळले आहे. टेकाॅफ झाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटातच हे विमान कोसळले. विमानात सुमारे २४२ प्रवासी होते. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला आहे आणि केंद्र सरकारकडून मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.
गुजरातमधील अहमदाबाद येथे मोठी दुर्घटना घडली. अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान क्रॅश झालं. अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानात एकूण 242 प्रवासी होते. विमान लंडनला निघाले होते पण अचानक अपघात झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
कोणत्या देशाचे किती प्रवासी होते?
बोईंग 787-8 या विमानाने आज गुरूवारी दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी अहमदाबाद विमानतळावरून लंडनच्या दिशेने टेकऑफ केले होते. त्यामध्ये एकूण 242 प्रवासी प्रवास करत होते, त्यापैकी 12 क्रू मेंबर्स होते, उर्वरित 230 प्रवाशांपैकी साधारण 169 भारतीय प्रवाशी होते. तर 53 ब्रिटिश नागरिक होते, एक प्रवासी कॅनडाचा होता आणि सात प्रवासी पोर्तुगीज नागरिक होते, अशी माहिती एअर इंडियाकडून देण्यात आली आहे. तर या विमान अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप

