मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाही… एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसी यांचं मोठं वक्तव्य
नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत, यासाठी आम्ही घटकपक्ष एकत्र आलो आहोत, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे
मुंबई, १९ फेब्रुवारी २०२४ : नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत, यासाठी आम्ही घटकपक्ष एकत्र आलो आहोत, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे. तर इंडिया आघाडीकडून मला कोणतंही निमंत्रण आलं नाही. उलट आम्हीच इंडिया आघाडीला ऑफर दिली होती असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात अकोला येथे ते एका जनसभेला संबोधित करत असताना त्यांनी केंद्र सरकार आणि राज्यसरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘ख्वाजा अजमेरीच्या दर्ग्यावर मोदी चादर चढवतात. पण ख्वाजा अजमेरीवर हे तुमचं कोणतं प्रेम आहे की, तुम्ही मशीद आमच्याकडून हिसकावून घेताय. हे कुठलं प्रेम आहे, तुम्ही मशिदीत चादर चढवणार, पण आमच्या मुलींचा हिजाब हिसकावून घेणार. आमच्याकडून मशीद हिसकावून घेण्याचे हे जे प्रयत्न सुरु आहेत, ते कोणतं प्रेम आहे?’, असा सवालही त्यांनी केला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

