Air India : दैव बलवत्तर… विमानाचं टेकऑफ अन् अचानक फ्लाईट 900 फूट खाली आलं, पुढे काय झालं बघा?
एअर इंडियाच्या विमानासह आणखी एक मोठा अपघात होता होता राहिला. नवी दिल्ली ते व्हिएन्ना येथे जाणारी विमान उड्डाणानंतर 900 फूटांपर्यंत खाली आली. उड्डाणानंतर काही मिनिटांनंतर, बोईंग 777 अचानक खाली येऊ लागले अन्..
एअर इंडियाच्या विमानात बिघाडाची मालिका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या अहमदाबाद विमान अपघातानंतर आणखी एक मोठा अपघात होता होता राहिल्याचे समोर आले आहे. दिल्लीहून व्हिएन्नाला जाण्यासाठी विमानाचं टेकऑफ झालं. मात्र अवघ्या काही वेळातच एअर इंडियाचे विमान साधारण 900 फूटांपर्यंत हवेतून अतानक खाली आले. अहमदाबादमधील एअरलाइन्सच्या एआय 171 विमानाच्या अपघातानंतर काही दिवसांनंतर ही घटना घडली. एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, चौकशीच्या अहवाल येईपर्यंत दोन्ही वैमानिकांना विमान उड्डाण करण्यापासून रोखले गेले आहे. तर तांत्रिक बिघाडामुळे हे विमान 900 फूट खाली आल्याची माहिती मिळतेय. पण या घटनेनंतर वैमानिकाने तत्काळ नियंत्रण मिळवून विमान योग्य उंचीवर नेलं आणि प्रवाशांची जीव भांड्यात पडला.