Air India Flight Cancel : लंडनला जाणारी एअर इंडियाची AI-159 फ्लाईट रद्द, प्रवाशांनी व्यक्त केला संताप
Air India Flight Cancellation : एअर इंडियाची लंडनला जाणारी फ्लाइट AI-159 अचानक रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
अहमदाबाद येथून लंडनला जाणारी एअर इंडियाची फ्लाइट आता रद्द करण्यात आलेली आहे. एअर इंडियाची फ्लाइट AI-159 आज तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आली आहे. विमान दुर्घटनेनंतर आज पहिल्यांदाच याठिकाणाहून लंडनला विमान जाणार होतं. मात्र आता अचानक हे विमान रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. त्यामुळे या अचानक करण्यात आलेल्या बदलावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या विमानाचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. यात 241 प्रवासी आणि 24 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या भीषण अपघातानंतर आज पहिल्यांदाच लंडनसाठी विमान सोडण्यात येणार होतं. मात्र अचानक हे विमान आता रद्द केलं आहे. त्याबद्दल कोणतंही कारण प्रवाशांना देण्यात आलेलं नाही. त्यामुळे एअर इंडियाच्या या ढिसाळ कारभारावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

