AJit Pawar Death Updates : दादा अन् दरारा दोघं गेले! अकाली निधनाने महाराष्ट्र हळहळला
अजित पवारांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील दादा आणि दरारा हरवला आहे. दशकभर सत्तेत असो वा विरोधात, अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचे सत्ताकारण अपूर्ण होते. त्यांचा थेट स्वभाव, प्रशासनावरील पकड आणि कामाचा वेग यामुळे ते कायम चर्चेत राहिले.
अजित पवारांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याचे वृत्त महाराष्ट्राच्या राजकारणासाठी धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने राजकारणातील दादा आणि दरारा दोन्ही संपुष्टात आले आहेत. राजकीय नफा-तोट्याचा विचार न करता, जे मनात तेच ओठांवर बोलणारा एक शक्तिशाली नेता महाराष्ट्राने गमावला आहे. गेल्या दशकात, ते सत्तेत असो वा सत्तेबाहेर, अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचे सत्ताकारणाचे वर्तुळ अपूर्ण होते.
You love Ajit Pawar or you hate Ajit Pawar, but you cannot ignore Ajit Pawar ही उक्ती त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाला चपखल लागू पडत होती. त्यामुळेच पहाटेच्या शपथविधीनंतरही महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांचे असणे महत्त्वाचे ठरले, आणि महाविकास आघाडीनंतर महायुती सरकारलाही दादा हवेहवेसे वाटले. अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण बेचव आणि आळणी होईल, असे अनेक जण मानतात. त्यांच्या अभ्यासू वृत्ती, प्रशासनावरील पकड आणि प्रचंड कामाचा वेग यामुळे त्यांना डावलून राजकारण करणे अशक्य होते, हे अनेकांना अनुभवातून समजले.

