AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amit Shah In Ajit Pawar Funeral : केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन

Amit Shah In Ajit Pawar Funeral : केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतलं अजित पवारांचं अंत्यदर्शन

| Updated on: Jan 29, 2026 | 12:28 PM
Share

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर लाखोंचा जनसमुदाय जमला आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुरुवातीला पुष्पचक्र अर्पण करून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर लाखोंचा जनसमुदाय जमला आहे. हा अंत्यसंस्कार शासकीय इतमामात आणि पूर्ण मानवंदनेसह पार पडणार आहे.

तत्पूर्वी या शोकसभेदरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुरुवातीला पुष्पचक्र अर्पण करून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहतील. वेळी उपस्थित जनसमुदायाने अमर रहे अमर रहे, अजित दादा अमर रहे अशा घोषणा देत आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. संपूर्ण परिसर अजित पवारांच्या जयजयकाराने निनादून गेला होता. श्रीराम श्राद्धाचे विधी आणि वैदिक मंत्रोच्चारानुसार धार्मिक संस्कार करण्यात आले. गंध उपतिष्ठतु, पुष्पम उपतिष्ठतु, दीपम उपतिष्ठतु, नैवेद्यम उपतिष्ठतु यांसारख्या विधी मंत्रांचे उच्चारण सुरू होते, जेणेकरून आत्म्याला शांती लाभेल. या शोकाकुल वातावरणात शासकीय सन्मानाने अजित पवारांना अंतिम निरोप देण्यात आला. अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) मध्ये शोककळा पसरली असून, बारामती आणि त्यांच्या मूळ गाव काटेवाडी येथेही दुःखाचे वातावरण आहे. महाराष्ट्राचे लक्ष या अंत्यविधीकडे लागले आहे.

Published on: Jan 29, 2026 12:28 PM