‘उचलली जीभ लावली टाळ्याला असे करू नये’; वड्डेटीवार यांच्यावर कोणी केली घणाघाती टीका?
त्यांनी अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वॉररूमध्ये बैठक घेतल्यावरून टीका करताना शिंदे आणि अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरू झाल्याचा दावा केला होता. तर वॉररूमध्ये बैठक घेण्याचा अधिकार अजित पवार यांना नसल्याचं देखील ते म्हटलं होते.
पुणे, 12 ऑगस्ट 2023 | विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकींच्या सपाट्यावरून निशाना साधला होता. त्यांनी अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वॉररूमध्ये बैठक घेतल्यावरून टीका करताना शिंदे आणि अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरू झाल्याचा दावा केला होता. तर वॉररूमध्ये बैठक घेण्याचा अधिकार अजित पवार यांना नसल्याचं देखील ते म्हटलं होते. त्यावरून आता अजित पावर यांनी वड्डेटीवार यांनी चांगलेच फटकारलं आहे. यावेळी अजित पवार यांनी, मुख्यमंत्री शिंदे यांची तब्बेत ठिक नसल्याने आम्हीच त्यांना विश्रांती घेण्यास सांगितल्याचे म्हणत अर्थमंत्री म्हणून वॉररूमध्ये बैठक घेतली. त्यावरून ओरड कशाला? क्षुल्लक गोष्टींवरुन बाऊ का करता असे म्हणत विरोधी पक्षनेतेपद हे जबाबदारीचे पद आहे सांभाळून बोला. आपण काय बोलतोय याचे भान ठेवा. नाहीतर उचलली जीभ लवली टाळ्याला असे करू नका असा सल्ला दिला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

