देवेंद्रजी, विरोधी पक्षालाही काही किंमत असते, इकडे जरा लक्ष द्या; अजित पवार आक्रमक
आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर काल रात्री हल्ला करण्यात आला आहे. त्यावरून अजित पवार आक्रमक झाले आहेत, ते काय म्हणालेत पाहा...
पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी, आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर काल रात्री हल्ला करण्यात आला आहे. प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्याची राज्य महिला आयोगानेही दखल घेतली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारही यावरून आक्रमक झाले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणी लक्ष घालण्यास सांगितलं आहे. “देवेंद्रजी, तुम्ही गृहमंत्री आहात. जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला लोकप्रतिनिधींवर जर हल्ला करण्यात येत असेल तर इतर महिलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे प्रज्ञा सातव यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरवण्यात यावी”, असं अजित पवार म्हणालेत.
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
