अजित पवारांच्या विमानाचा अपघात; बारामतीत लॅंडींगदरम्यान घडली दुर्घटना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती येथे लँडिंग करताना किरकोळ अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभांसाठी ते बारामतीत जात असताना ही घटना घडली. विमानातून उतरताना काही जण जखमी झाल्याचे वृत्त आहे, परंतु नेमके कोण जखमी झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस व कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आहेत.
बारामती येथे लॅंडींग दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात काहीजण जखमी झाले असल्याची माहिती आहे. आज बारामतीत अजित पवार यांची सभा होती. यावेळी हा अपघात झाला आहे. एका शेतात हे विमान कोसळलं. त्यानंतर त्यातून धुराचे मोठे लोट देखील निघाल्याचं दिसून आलं. दरम्यान, या अपघातात अजित पवार देखील गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ जात असताना बारामती विमानतळावर हा अपघात झाला. या अपघातात विमानात असलेले काही जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. अजित पवार हे आज बारामती तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकांसाठी चार प्रचारसभांना संबोधित करणार होते. अपघाताची सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध नसली तरी, हा अपघात लँडिंग दरम्यान झाल्याचे सांगितले जात आहे. अजित पवारांचे निकटवर्तीय आणि पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक रणजीत शिवतारे यांनी या घटनेची माहिती दिली आहे. या घटनेनंतर पोलीस आणि अन्य कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास सुरू आहे. जखमींची नेमकी ओळख अजून समोर आलेली नाही.
Published on: Jan 28, 2026 09:27 AM
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला
शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
