Maharashtra Election 2026 : धारावीत मशाल बटण दबतच नाहीये? माहिती समोर येताच मतदारांमध्ये मोठा गोंधळ!
मुंबईतील धारावी, वॉर्ड क्रमांक १८४ मध्ये मतदान प्रक्रियेत मशाल चिन्हाचे बटण दाबत नसल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे माजी नगरसेवक वसंत नकाशे यांनी केला आहे. काही मतदारांनी मतदान करताना विलंब झाल्याचे आणि तांत्रिक अडचणी आल्याचे सांगितले. यामुळे मतदारांमध्ये त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला मत मिळाले की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबईतील धारावी येथील वॉर्ड क्रमांक १८४ मध्ये मतदान प्रक्रियेदरम्यान गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ठाकरे शिवसेनेचे माजी नगरसेवक वसंत नकाशे यांनी दावा केला आहे की, मशाल चिन्हासमोरील बटण व्यवस्थित दाबलं जात नाहीये. यामुळे मतदारांना त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला मत देता आले की नाही, याबाबत संशय निर्माण झाला आहे. या घटनेमुळे मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र आहे. प्रणव प्रकाश सावंत नावाच्या मतदाराने आपला अनुभव सांगितला. त्यानुसार, सकाळी मशीन बंद होती आणि दोन वेळा बटण दाबूनही मत नोंदवले गेले नाही. तिसऱ्या प्रयत्नात मतदान झाल्याचे सांगण्यात आले, परंतु लाल लाईट लागली नाही. तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर चौथ्या प्रयत्नात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. माहितीनुसार, ही तांत्रिक अडचण स्थानिक मतदारांमध्ये चिंतेचे कारण बनली आहे, विशेषतः आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या (BMC Election 2026) पार्श्वभूमीवर हा प्रकार निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो.
धारावीत मशाल बटण दबतच नाहीये? माहिती समोर येताच मतदारांत मोठा गोंधळ
रूदाली तर उद्या आता प्रॅक्टिस सुरू, चित्रा वाघ यांची ठाकरेंना टोलेबाजी
भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर शिंदे सेना आणि ठाकरे सेना भिडले
शाई पुसली चूक कोणाची? निवडणूक आयोगानं मतदारांवर फोडलं खापर

