Special Report | समीर वानखेडे यांनी शाहरुख खानकडून खरंच घेतली 25 कोटींची खंडणी?
VIDEO | समीर वानखेडे यांच्याविरोधात नेमक्या कोणत्या आरोपांमुळे सीबीआयचा छापा? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : ड्रग्स कारवाईत ज्या समीर वानखेडेंच्या पाठिशी भाजप नेते उभे राहिले होते. त्याच वानखेडेंच्या घरावर सीबीआयचा छापा पडलाय. आर्यन खान ड्रग्स प्रकरणात वानखेडेंनी शाहरुख खानकडूनं 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप होतोय. सीबीआयनं गुन्हाही दाखल केलाय. विशेष म्हणजे असेच आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांनी केले होते. ज्या अधिकाऱ्याला कधीकाळी मुंबईतल्या ड्रग्समाफियांचा कर्दनकाळ म्हटलं गेलं, त्याच समीर वानखेडेंवर ड्रग्स केसच्या नावानं सेलिब्रिटींकडून खंडणी उकळल्याचा आरोप झालाय. याच प्रकरणात सीबीआयनं मुंबईतल्या वानखेडेंच्या घरावर छापा टाकला, आणि भ्रष्टाचाराचा गुन्हाही दाखल करुन घेतलाय. विशेष गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांनी शाहरुख खानच्या मुलाची अटक फक्त खंडणी उकळण्यासाठीच झाल्याचा दावा केला होता. आता त्याच आरोपात सीबीआयनं वानखेडेंच्या घरावर छापा टाकलाय.
समीर वानखेडेंसह जी नावं मलिकांनी घेतली होती, जवळपास त्याच नावांच्या व्यक्तींवर सीबीआयनं भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल केले आहेत. समीर वानखेडेंवर झालेल्या आरोपांवर भाजप नेत्यांची आता वेगळी भूमिका आहे. दीड वर्षांपूर्वी समीर वानखेडेंच्या कार्याचं भाजप नेते कौतूक करत होते. मात्र आता वानखेडेंवरच गंभीर आरोप झाल्यानंतर जो भ्रष्टच असेल त्यांच्यावर कारवाई होणारच अशी भाजपची भूमिका आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट