राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार? काय म्हणाला ठाकरे गटाचा नेता?
मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. याच पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी महत्वाचे विधान केले आहे.
मुंबई: अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने राजकीय समीकरण बदलून गेलं आहे. अशातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. ठाकरे गट आणि मनसैनिकांनी या दोन्ही नेत्यांना आवाहन करत बॅनरबाजीही केली. ही बॅनरबाजी सुरू असतानाच आता एक मोठी बातमी आली आहे. मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. याच पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी महत्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले की, “मनसेच्या प्रवक्त्यांनी तशी भूमिका मांडली होती, ते माझ्या ऐकण्यात आलं होतं. मात्र शिवसेनेच्या व्यासपीठावर अशी कोणतीही चर्चा झालेली नाही.”
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

