Amol Kolhe : ‘दादागिरी वाढली तर उघडावा लागतोय तिसरा डोळा अन्…’, अमोल कोल्हेंचा रोख अजितदादांवर?
शरद पवार यांनी बारामतीतील आपल्या उमेदवार अर्थात नातू युगेंद्र पवार यांच्यासाठी सांगता प्रचारसभा घेतली. यावेळी शरद पवार गट राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी युगेंद्र पवार यांच्यासाठी तुफान बॅटिंग केली.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. आज राज्यभरात राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे प्रचाराला वेग आला असून सर्वच राजकीय नेत्यांच्या आज सांगता सभा होतायत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत अजित पवार गट राष्ट्रवादीची सांगता सभा घेतली. तर शरद पवार यांनी बारामतीतील आपल्या उमेदवार अर्थात नातू युगेंद्र पवार यांच्यासाठी सांगता प्रचारसभा घेतली. यावेळी शरद पवार गट राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी युगेंद्र पवार यांच्यासाठी तुफान बॅटिंग केली. ‘कोणी अरेरावी करत असेल तर बारामतीची जनता भोळी, तसा शिवशंकर भोळा आणि बारामतीत दादागिरी वाढली तर उघडावा लागतोय तिसरा डोळा…’, असं अमोल कोल्हे म्हणाले आणि त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. पुढे ते म्हणाले, हा नियतीचा संकेत आहे. तीन नंबरच्या युगेंद्र पवार यांच्या नावापुढचं बटण दाबून युगेंद्र पवार यांना सर्वाधिक मतांनी विजयी करा, असं आवाहन देखील अमोल कोल्हे यांनी बारामतीकरांना केल.
Published on: Nov 18, 2024 05:23 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
