VIDEO | हुडहुडी भरवणारी थंडी, बोचरे वारे, विदर्भाचं नंदनवन धुक्यात हरवलं!

| Updated on: Mar 24, 2021 | 3:58 PM

अमरावतीतील चिखलदरा हे पर्यटनस्थळ धुक्यात हरवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (Amravati Chikhaldara fog)

VIDEO |  हुडहुडी भरवणारी थंडी, बोचरे वारे, विदर्भाचं नंदनवन धुक्यात हरवलं!
चिखलदरा
Follow us on

अमरावती : राज्यात ठिकठिकाणी उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या असल्या तरी अमरावतीत मात्र कडाक्याची थंडी पडली आहे. यामुळे अमरावतीतील चिखलदरा हे पर्यटनस्थळ धुक्यात हरवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (Amravati Chikhaldara Hill Station fog)

गेल्या चार दिवसांपासून अमरावतीत अवकाळी पाऊस पाहायला मिळत आहे. त्यामुळे अमरावतीत मोठ्या प्रमाणात थंडी वाढली आहे. यामुळे सकाळी फिरणाऱ्यांचं प्रमाण देखील कमी झालेलं आहे. विदर्भाच नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे पहाटेपासूनच हुडहुडी भरवणारी थंडी अनुभवायला मिळत आहे.

अमरावती जिल्ह्यात पर्यटनसाठी प्रसिद्ध असलेल्या चिखलदरा येथे प्रचंड प्रमाणात थंडी वाढली आहे. अमरावतीत पहाटेपासून थंड बोचरे वारे वाहत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी धुकं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिखलदरा धुक्यात न्हाऊन निघालं आहे. (Amravati Chikhaldara Hill Station fog)