आनंद दिघे यांचा ‘तो’ किस्सा आणि आमदारांनी केली ‘ही’ नवी घोषणा

महेश पवार, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 27, 2023 | 3:03 PM

औरंगाबाद : स्वर्गीय आनंद दिघे ( anand dighe ) यांची जयंती आज महाराष्ट्र्र साजरी होत आहे. दिवाकर रावते पालकमंत्री असताना अनेकदा ठाण्यात जाण्याचा योग आला. त्यांच्या बँकेत काही जमा नव्हती पण त्यांनी असंख्य माणसे जमविली होती. आनंद दिघे यांचा दरबार रात्री बारा वाजता सुरु व्हायचा. तो सकाळी पाच पर्यंत चालायचा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर कुठलेही […]

औरंगाबाद : स्वर्गीय आनंद दिघे ( anand dighe ) यांची जयंती आज महाराष्ट्र्र साजरी होत आहे. दिवाकर रावते पालकमंत्री असताना अनेकदा ठाण्यात जाण्याचा योग आला. त्यांच्या बँकेत काही जमा नव्हती पण त्यांनी असंख्य माणसे जमविली होती. आनंद दिघे यांचा दरबार रात्री बारा वाजता सुरु व्हायचा. तो सकाळी पाच पर्यंत चालायचा.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर कुठलेही पद न घेणारे ते एकमेव दुसरे नेते होते. आजही ठाण्यात कोणत्याही कार्यक्रमात त्यांचा फोटो लावल्याशिवाय कार्यक्रम होत नाही. त्यांचे नाव घेऊनच काही लोक मोठे झाले. ठाण्याचे शिवसैनिक त्यांना कधीही विसरणार नाहीत. माजी मुख्यमंत्री काल ठाण्यात गेले तेव्हा त्यांच्यासमोर नतमस्तक झाले. ही आनंद दिघे यांची उंची होती.

इंग्रजांनी आपणास रात्री स्वातंत्र्य दिले त्यामुळे आनंद दिघे हे नेहमी १५ ऑगस्टला नाही तर १४ ऑगस्टला रात्री बारा वाजता टेभीनाक्यावर झेंडावंदन करायचे. त्यांचा हाच आदर्श घेऊन येत्या १४ ऑगस्टला रात्री आपण शहरात झेंडावंदन करणार आहोत, अशी घोषणा शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी केली.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI