Chandrababu Naidu : चंद्राबाबू नायडूंचा वक्फ बोर्डाला पाठिंबा, पण घातली ही मोठी अट
waqf Amendment Bill : वक्फ बोर्डाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा पाठिंबा असल्याचं समोर आलं आहे. मात्र त्यासाठी त्यांनी एक अट घातली आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा वक्फ बोर्डाला पाठिंबा असल्याचं समोर आलं आहे. मात्र त्यासाठी त्यांनी एक अट घातली आहे. वक्फ बोर्ड विधेयकावरून काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण सुरु असल्याचं दिसून आलं आहे. आता २ एप्रिल रोजी हे वक्फ विधेयक संसदेत मांडलं जाण्याची शक्यता आहे. वक्फ विधेयकाला याआधी विरोधकांनी जोरदार विरोध केला होता. यानंतर आता पुन्हा एकदा सुधारित वक्फ विधेयक आज लोकसभेत मांडलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. या वक्फ बोर्ड विधेयकाला आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र त्यासाठी त्यांनी एका अट घातली आहे. वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिम व्यक्तीची नेमणूक नको, असं चंद्राबाबू नायडू यांनी म्हंटलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या अटीवरच चंद्राबाबू नायडू वक्फ बोर्ड विधेयकाला पाठिंबा देणार आहे.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?

