एसटीचे पैसे खाणाऱ्या दलालांनी… गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कुणाचे गंभीर आरोप?
जेव्हा सत्तेत महाविकास आघाडी होती तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत सरकारविरोधात याचिकाकर्ते होते. आता महायुती सत्तेत असताना अंगणवाडी संपाला विरोध करत त्यांच्या संपाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात याचिका दाखल केली
मुंबई, १६ जानेवारी २०२४ : मानधन वाढीसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी संप पुकारला आहे. त्याविरूद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मात्र त्यांच्या या भूमिकेवरून अंगणवाडी सेविका चांगल्याच आक्रमक बनल्या आहेत. जेव्हा सत्तेत महाविकास आघाडी होती तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत सरकारविरोधात याचिकाकर्ते होते. आता महायुती सत्तेत असताना अंगणवाडी संपाला विरोध करत त्यांच्या संपाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात याचिका दाखल केली. गेल्या दोन वर्षात सदावर्ते यांनी भूमिका बदलली. २ वर्ष झाली तरी एसटीचं विलीनीकरण झालेलं नाही. या महिन्यात तर कर्मचाऱ्यांचा पगारही रखडला होता मात्र एसटीसाठी जवळपास २ महिने संप करणारे सदावर्ते आता अंगणवाडी संपाविरोधात कोर्टात पोहोचले आहे. यावरूनच अंगणवाडी महिला चांगल्या आक्रमक झाल्या आहेत. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात

