सत्तासंघर्षावरील सुनावणीआधी खासदार अनिल देसाई यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होतेय. त्याआधी ठाकरेगटाचे नेते, खासदार अनिल देसाई यांनी माध्यमांशी बातचित केली आहे. पाहा ते काय म्हणालेत...
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होतेय. त्याआधी ठाकरेगटाचे नेते, खासदार अनिल देसाई यांनी माध्यमांशी बातचित केली आहे. खरी शिवसेना कोण, आज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठावर सुनावणी होणार आहे. सुनावणीपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे शिंदे गट म्हणाले की, नबाम रेबिया निकालामुळे आमदारांना अपात्र ठरवण्याचा सभापतींचा अधिकार हिरावून घेतला जात नाही. शिंदे कॅम्पच्या या उत्तराचा अर्थ असा होतो की, शिंदे कॅम्पला नबाम रेबियाच्या निर्णयाचा फेरविचार करायचा नाही. तर दुसरीकडे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्या नेतृत्वाखालील उद्धव कॅम्पने नबाम रेबियाच्या निकालाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली आहे.
Published on: Feb 14, 2023 11:14 AM
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
