Nagpur | नागपुरात अनिल देशमुखांच्या साई शिक्षण संस्थेवर आयकर विभागाची धाड

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या साई शिक्षण संस्थेच्या कार्यालयावर आयटीची धाड आजं दुसऱ्या दिवशीही सुरु आहे. काल दिवसभर आणि रात्रभर आयटीच्या अधिकाऱ्यांकडून साई शिक्षण संस्थेच्या कार्यालयाची झाडाझडती सुरु आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या साई शिक्षण संस्थेच्या कार्यालयावर आयटीची धाड आजं दुसऱ्या दिवशीही सुरु आहे. काल दिवसभर आणि रात्रभर आयटीच्या अधिकाऱ्यांकडून साई शिक्षण संस्थेच्या कार्यालयाची झाडाझडती सुरु आहे. रामदासपेठ परिसरातील मिडास हाईट इमारतीमधील साई शिक्षण संस्थेच्या कार्यालवर ही धाड सुरु आहे. अनिल देशमुख यांच्या घरी पहाटे चारापर्यंत आयटीचे अधिकारी झाडाझडती घेत होते, तर त्यांच्या साई शिक्षण संस्थेच्या कार्यालयावर आज दुसऱ्या दिवशीही धाडसत्र सुरुच आहे. साई शिक्षण संस्थेत आलेल्या ४ कोटी १० लाख रुपयांच्या डोनेशनबाबत आयटीला संशय आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI