सुनील तटकरे हे भाजपच्या… खळबळजनक दावा, त्या दीड वर्षाबाबत अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?
राष्ट्रवादीत सध्या वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. भेटीगाठी, नाराजीनाट्य तसेच बैठकांचे सत्र सुरूच आहे. याच राजकीय घडामोडी आणि ऑपरेशन टायगर या प्रकरणावर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. "अशा प्रकारच्या गुप्त मोहिमांमुळे आणि अंतर्गत कुरघोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची प्रतिमा अत्यंत मलिन झाली आहे.
राष्ट्रवादीत सध्या वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत. भेटीगाठी, नाराजीनाट्य तसेच बैठकांचे सत्र सुरूच आहे. याच राजकीय घडामोडी आणि ऑपरेशन टायगर या प्रकरणावर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. “अशा प्रकारच्या गुप्त मोहिमांमुळे आणि अंतर्गत कुरघोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची प्रतिमा अत्यंत मलिन झाली आहे. यामुळे सामान्य लोकांचा राजकारणावरील विश्वास उडाला आहे,” अशी खंत अंजली दमानिया यांनी व्यक्त केली. नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक खळबळजनक दावे केले.
दामानिया म्हणाल्या, माझ्या माहितीनुसार अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यात फारसे जमत नव्हते, त्यांचे संबंध फारसे चांगले नव्हते, असा दावाही अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे या नेत्यांमधील अंतर्गत समीकरणे आता कोणत्या दिशेला जातात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यानंतर अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे, त्या म्हणाल्या, ‘सुनील तटकरेंचं अजित पवारांशी जवळपास सव्वा वर्ष जमत नव्हतं. ते अजित पवारांपासून अनेक गोष्टी लपवायचे. जसे शिवसेनेतील उदय सामंत हे भाजपच्या जवळचे आहेत, तसेच राष्ट्रवादीतील सुनील तटकरे हे भाजपच्या जवळचे होते. ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील अशी परिस्थिती होती.’
Published on: May 20, 2026 01:35 PM
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...

