Anjali Damania Video : ‘तो ठणठणीत, त्याचे रिपोर्ट नॉर्मल’; वाल्मिक कराडच्या तब्येतीवरून अंजली दमानियांचा सवाल
संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी काल रात्री अंजली दमानिया यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. वाल्मिक कराडचे रिपोर्ट नॉर्मल आहे तो अगदी ठणठणीत असल्याचं दमानिया यांनी धनंजय देशमुख यांना सांगितलं.
सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी काल रात्री अंजली दमानिया यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. वाल्मिक कराडचे रिपोर्ट नॉर्मल आहे तो अगदी ठणठणीत असल्याचं दमानिया यांनी धनंजय देशमुख यांना सांगितलं. सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अंजली दमानिया यांची भेट घेतली. बीड हत्या प्रकरणावरून धनंजय देशमुख यांनी अंजली दमानिया यांच्यासोबत चर्चा केली. तर धनंजय देशमुख यांच्यासमोरच दमानिया यांनी बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना फोन केला. कराड अर्थर रोड जेलमध्ये राहिले तर सरळ होतील, असं वक्तव्य दमानिया यांनी धनंजय देशमुख यांच्यासमोरच केले. तर रात्रीचा प्रवास करू नका ते सुरक्षित नाहीये असाही सल्ला यावेळी दमानिया यांनी दिलाय. सिटी स्कॅन रिपोर्ट्स नॉर्मल आहेत सोनोग्राफी रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आहेत. त्यामुळे कराडला काहीही झालेलं नाहीये असंही अंजली दमानिया यावेळी म्हणाल्या. त्यांना फक्त युरिनरी इन्फेक्शन आहे. ज्याच्यासाठी अँटीबायोटिक देऊन त्यांना उद्याच्या उद्या डिस्चार्ज आहे आणि त्या माणसाचं सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल आहे सोनोग्राफी अख्खी नॉर्मल आहे काहीही झालेलं नाहीये, असं दमानिया यांनी म्हटलं. बघा व्हिडीओ काय म्हणाले अंजली दमानिया?
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली

