Anjali Damania : ‘दोन हरलेली माणसं एकत्र….’, ठाकरे बंधूच्या युतीबाबत अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?
महाराष्ट्रासमोर आमची भांडणं, वाद हे किरकोळ असल्याचे म्हणत एकत्र येण्यात मला तरी कुठलीही अडचण वाटत नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या भुमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर त्यांच्या युतीची चांगलीच चर्चा रंगलीये
गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर आणि एकत्र येण्यासंदर्भात चर्चांना उधाण आलं आहे. ठाकरे बंधूच्या एकत्र येण्यावर राजकीय वर्तुळातील सगळेच नेते प्रतिक्रिया देत आहेत. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. दोन हरलेली माणसं एकत्र आली असा प्रकार आहे, असं म्हणत त्यांनी खोचकपणे प्रतिक्रिया दिली. पुढे त्या असेही म्हणाल्या, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे एकत्र येण्याची बातमी नुकतीच समजली आणि धक्का बसला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांकडे आता एकमेकांबरोबर आल्याशिवाय कोणताही पर्याय नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे एकत्र आले तरी ठीक नाही आले तरी ठीक.. शेवटी राजकारण आहे. कोणी कोणाही सोबत जाऊ शकतं. यासोबतच अंजली दमानिया यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवरूनही भाष्य केलं. अजित पवार आणि शरद पवार यांची चौथ्यांदा बैठक झाली. हे म्हणजे ऐकावं ते नवलंच आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सकाळी वेगळं संध्याकाळी वेगळं…काहीही घडू शकतं, असं म्हणत त्यांनी खोचक प्रतिक्रिया दिली.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?

