AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | मोदींचे कौतुक करणारे Anupam Kher कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यानचं पंतप्रधानांचं काम पाहून नाराज

| Updated on: May 13, 2021 | 7:16 PM
Share

प्रसिद्ध सिनेअभिनेते अनुपम खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पहिल्यांदाच थेट टीका केली आहे. (anupam kher narendra modi corona pandemic second wave)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ( Corona pandemic second wave) संपूर्ण देशाची झोप उडाली आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा, ऑक्सिजनची कमतरता अशा गोष्टींमुळे मागील काही दिवसांपासून अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या सर्व गोष्टींमुळे मागील काही दिवसांपासून मोदी सरकारवर देश-विदेशातून टीका होत आहे. मात्र, आता मोदी यांचे पाठीराखे असणारेसुद्धा आता त्यांच्याविरोधात बोलू लागले आहेत. प्रसिद्ध सिनेअभिनेते अनुपम खेर (Anupam Khe) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर पहिल्यांदाच थेट टीका केली आहे. त्यांनी प्रतिमा संवर्धनापेक्षाही आयुष्यात बरंच काही महत्त्वाचं असतं, असं परखड भाष्य केलं आहे. इंग्रजी वृत्तवाहिनी एनडीटीव्ही (NDTV) वर बोलताना त्यांनी ही टीका केलीये.

Published on: May 13, 2021 07:16 PM