पंकजा मुंडे यांच्या प्रश्नावर, अनुराग ठाकूर म्हणतात, “चलो, धन्यवाद”
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती कार्यक्रमाच्या भाषणामध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. "मी भाजपची आहे, पण भाजप माझा नाही", असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे.
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती कार्यक्रमाच्या भाषणामध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. “मी भाजपची आहे, पण भाजप माझा नाही”, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या याच वक्तव्याचे आता वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ काढले जात असून, यावर राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हटलं आहे. पंकजाताई भाजप माझ्या पाठिशी आहे, असंच म्हणाल्या, असं बावनकुळे म्हणाले. तर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना पंकजा मुंडे यांच्यावर प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे. “चला धन्यावाद”, असं म्हणत त्यांनी यावर बोलण्याचं टाळलं आहे.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

