Ladki Bahin Yojana : ‘त्या’ महिलांपर्यंत लाडकी बहीण योजना पोहोचवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; जीआर काय?
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी तीन कोटी रूपयांची तरतूद केली आहे. सोशल मीडिया आणि डीजिटल प्रसिद्धीसाठी हा खर्च केला जाणार आहे. त्याबाबतचा जीआरही राज्य सरकारने जारी केला आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी तीन कोटी रूपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातील सर्व महिलांपर्यंत पोहोचावी म्हणून सरकार आता लाडकी बहीण योजनेचा सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातूनही प्रचार करणार आहे. महायुती सरकारकडून यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महायुतीने निवडणुकीच्या तोंडावर गेल्या वर्षी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मात्र आता गरजू आणि गावखेड्यातील महिलांना ही योजना कळावी म्हणून राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी तीन कोटी रूपयांची तरतूद केली आहे. या संदर्भाील जीआरही राज्य सरकारने जारी केला आहे. लाडकी बहीण या योजनेसाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या आराखडा आणि त्याकरिता होणाऱ्या खर्चासाठी तीन कोटी रुपयांची मान्यता देण्यात येत आहे, असं जीआर मध्ये म्हटलं आहे. सोशल मीडियावरील खर्चासाठी दीड कोटी आणि डीजिटल मीडियावरील खर्चासाठी दीड कोटी अशा एकूण तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या जाहिराती महिला व बाल विकास विभागाच्या समन्वयाने करण्याच्या सूचनाही जीआरमध्ये देण्यात आल्या आहेत. या जाहिरातीतून योजनेची माहिती आणि त्याच्या अटी तसेच शर्तीही महिलांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवल्या जाणार आहेत.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं

'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध

'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान

'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
