AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया

अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे… सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया

| Updated on: Aug 18, 2026 | 6:07 PM
Share

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या पक्षाच्या फुटीसंदर्भातील सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे. कपिल सिब्बल यांनी प्रभावी युक्तिवाद केल्याचे त्यांनी सांगितले. सावंत यांच्या मते, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या कार्यकक्षेबाहेर जाऊन काम केले आहे.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या पक्षाच्या फुटीसंदर्भातील सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे. कपिल सिब्बल यांनी प्रभावी युक्तिवाद केल्याचे त्यांनी सांगितले. सावंत यांच्या मते, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या कार्यकक्षेबाहेर जाऊन काम केले आहे. काँग्रेस पक्षाच्या फुटीशी शिवसेनेच्या फुटीची तुलना योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसमध्ये दोन्ही बाजूंनी आमदार, खासदार आणि पदाधिकारी विभागले होते, तर शिवसेनेमध्ये २१ जून २०२१ रोजी केवळ १६ आमदार वेगळे झाले होते, असे सावंत यांनी नमूद केले.

पक्षाच्या घटनेतील मुख्य नेता या पदाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. १९९९ च्या पक्षघटनेत हे पद अस्तित्वात नव्हते, असे ते म्हणाले. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोग आणि अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेवर प्रकाश टाकला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतरही अध्यक्षांनी दोन्ही गटातील आमदारांना अपात्र ठरवले नाही, ही बाब कपिल सिब्बल यांनी मांडली. यामुळे निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे अरविंद सावंत यांनी म्हटले.

Published on: Aug 18, 2026 06:07 PM

Follow Us