AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर

Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर… मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल…मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर

| Updated on: Oct 02, 2026 | 6:16 PM
Share

अभिजीत दिपकेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना "मी पुन्हा येईन" या वाक्याची आठवण करून दिली आहे. आंदोलनासाठी तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्यास तीन दिवस नव्हे, तर तीन महिने जेलमध्ये राहूनही बाहेर आल्यावर तीच गोष्ट बोलण्याची तयारी त्यांनी दर्शवली. महाराष्ट्राच्या वारशाचे स्मरण देत दिपकेंनी फडणवीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राजकीय वर्तुळात सध्या अभिजीत दिपके यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे, ज्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान दिले आहे. आंदोलनादरम्यान जेलमध्ये टाकण्याच्या धमक्यांवर दिपके यांनी फडणवीसांच्याच गाजलेल्या “मी पुन्हा येईन” या वाक्याची आठवण करून दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांसाठी “तीन दिवस प्रोटेस्ट करसाल तर जेलमध्ये जावे लागेल” असे म्हटले होते, यावर दिपके यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, फडणवीसांना जेलमध्ये टाकायचे असेल तर त्यांनी खुशाल टाकावे. “तीन दिवस नाही, तर तीन महिने जेलमध्ये ठेवा. जेलमधून बाहेर आल्यावर मी तीच गोष्ट बोलणार, जी तुम्ही म्हणायचे – मी पुन्हा येईन,” असे दिपके यांनी ठणकावून सांगितले.

यावेळी दिपके यांनी महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचेही स्मरण करून दिले. “महाराष्ट्राला काही वारसा आहे, लेगसी आहे. जिजाऊ, सावित्रीबाई फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांचा हा महाराष्ट्र आहे. तुम्ही विसरला असाल, आम्ही विसरणार नाही,” असे ते म्हणाले. महाराष्ट्रात लहान मुलींना आणि मुलांना अशा धमक्या दिल्या जात नाहीत, असे म्हणत त्यांनी फडणवीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दिपके यांच्या या आक्रमक प्रतिक्रियेमुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Published on: Oct 02, 2026 06:16 PM

Follow Us