Aryan Khan | क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानला जामीन नाहीच, 20 ऑक्टोबरला पुढचा निर्णय

आर्यनच्या जामिनावरचा निर्णय आता 20 ऑक्टोबरला होईल. आर्यन खान सध्या ड्रग्ज प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. त्या प्रकरणाच्या सुनावणीवर कोर्टानं निर्णय राखून ठेवला आहे.

Aryan Khan | क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानला जामीन नाहीच, 20 ऑक्टोबरला पुढचा निर्णय
| Updated on: Oct 14, 2021 | 5:48 PM

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अडचणी अजून संपताना दिसत नाहीत. कारण कोर्टानं आर्यन खानच्या जामीनावरचा निर्णय 20 ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवलाय. त्यामुळे पुढचे 6 दिवस आर्यन खानला जेलमध्येच काढावे लागतील. आर्यनच्या जामिनावरचा निर्णय आता 20 ऑक्टोबरला होईल. आर्यन खान सध्या ड्रग्ज प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. त्या प्रकरणाच्या सुनावणीवर कोर्टानं निर्णय राखून ठेवला आहे.

आर्यन खानसह इतर आठ आरोपींच्या जामीन अर्जावर आज सकाळपासून सुनावणी सुरु होती. या सुनावणीत दोन्ही बाजूंचे युक्तीवाद पूर्ण झाले आहेत. पण कोर्टाने याबाबतचा निकाल 20 ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे आर्यनसह इतर आरोपी न्यायालयीन कोठडीतच राहणार आहेत. एनसीबीच्या वकिलांचा वकिलांचा आज एक वाजेपासून युक्तीवाद सुरु होता. लंच ब्रेकनंतरही त्यांचा युक्तीवाद सुरु होता. आरोपींच्या वकिलांनी सुद्धा युक्तीवाद केला. पण या प्रकरणाचा निकाल 20 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. कारण पुढील पाच दिवस दसरा आणि इतर शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमुळे सुनावणीचा निकाल 20 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. विशेष म्हणजे कालपासून या प्रकरणावर सुनावणी सुरु होती. त्यामुळे आर्यनसह इतर आरोपींना आज दिलासा मिळेल, अशी चर्चा होती. पण आता पुढचे पाच दिवस आरोपींना जेलमध्येच राहावं लागेल.

Follow us
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.