Special Report | आर्यन खानला 20 ऑक्टोबरपर्यंत जेलमध्ये राहावं लागणार!
अभिनेता शाहरुख खानला पुन्हा एकदा झटका बसला आहे. कारण आर्यन खानच्या जामीन अर्जावरील निकाल कोर्टाने राखून ठेवला आहे. त्यामुळे पुढचे पाच दिवस आता आर्यनला जेलमध्येच राहावं लागणार आहे.
अभिनेता शाहरुख खानला पुन्हा एकदा झटका बसला आहे. कारण आर्यन खानच्या जामीन अर्जावरील निकाल कोर्टाने राखून ठेवला आहे. त्यामुळे पुढचे पाच दिवस आता आर्यनला जेलमध्येच राहावं लागणार आहे. तर आर्यन ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर शाहरुख खानच्या समर्थनार्थ बॉलिवूड आल्याचं दिसतंय. क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तसेच अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. आर्यन खानच्या बाजूने अॅड. अमित देसाई यांनी युक्तीवाद केला. त्यांनी पूर्ण क्षमतेने आर्यन खानची बाजू मांडून त्याला जामीन देण्यात यावा अशी मागणी केली. तर एनसीबीच्या वकिलांनी विरोध केला. दुपारी एक वाजपल्यापासून एनसीबीच्या वकिलांचा युक्तीवाद सुरु होता. दोन्ही बाजू जाणून घेतल्यानंतर न्यायालयाने आपाला निकाल राखून ठेवला आहे.

