Aryan Khan | आर्यनचे वकील, शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानी कोर्टात हजर

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला आज पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. आर्यनला जामीन मिळणार की त्याच्या कोठडीत वाढ होणार, याचा फैसला काही वेळात होणार आहे. एनसीबीने (NCB) अटक केल्यानंतर आर्यन खानची कोठडी 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती.

ड्रग्ज प्रकरणात देण्यात आलेल्या एका दिवसाच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर आर्यन खानला 4 ऑक्टोबरला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयात तब्बल अडीच तासांचा युक्तिवाद झाला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने 7 ऑक्टोबरपर्यंत आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना कोठडी सुनावली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI