‘तर अधिकाऱ्याला झोडपून काढू’, बच्चू कडू यांनी कुणाला भरला दम आणि दिला थेट इशारा?
VIDEO | आशा सेविकांना आरोग्य विभागाकडून ऑनलाइन काम करण्यासाठी सक्ती. आमदार बच्चू कडू यांनी फोनवरून भरला सरकारी अधिकाऱ्याला भरला दम आणि दिला इशारा म्हणाले, 'ऑनलाइन कामाची सक्ती केल्यास संबधित अधिकाऱ्याला झोडपून काढू'
अमरावती, 28 ऑगस्ट 2023 | आशा सेविकांना आरोग्य विभागाकडून ऑनलाइन काम करण्यासाठी सक्ती केली जात आहे. ऑनलाइन काम केले नाही तर कामावरुन कमी करण्याची धमकी अधिकारी वारंवार आशा सेविकांना देत असतात. त्यामुळे काही आशा सेविका आमदार बच्चू कडू यांना भेटल्या असता आमदार बच्चू कडू यांनी थेट फोन करून अधिकाऱ्याला झोडपून काढण्याची धमकी दिल्याचे पाहायला मिळाले. अनेक आशा सेविकांनी आमदार बच्चू कडू यांच्या घरी जाऊन त्यांना राखी बांधत आपली समस्या मांडली. यावेळी बच्चू कडू यांनी तातडीने संबधित अधिकाऱ्यांना फोन लावून संपर्क साधला. आशा सेविकांना जबरदस्ती कोणीही ऑनलाइन कामाची सक्ती केल्यास संबधित अधिकाऱ्याला झोडपून काढू असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. मात्र आता पुढे नेमकं आरोग्य विभाग काय निर्णय घेतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

