AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...

Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले…

| Updated on: Oct 02, 2026 | 4:37 PM
Share

संजय शिरसाट यांनी दुष्काळ, शेतकरी मदत आणि राजकीय आरोपांवरून आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी दिशा सॅलियन प्रकरणातील विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तसेच सरकारची दुष्काळ मदत, MPSC भरती प्रक्रिया आणि आश्रमशाळांमधील गैरकारभाराविरोधातील कारवाईची बाजू मांडली. विरोधक केवळ राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारच्या उपाययोजनांवर भर दिला, तसेच MPSC भरती प्रक्रिया जलद करण्याच्या प्रयत्नांची माहिती दिली.

यावेळी शिरसाट यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांनी विशेषतः दिशा सॅलियन प्रकरणावरून विरोधकांच्या दुहेरी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आम्ही जेवढी स्पष्ट भूमिका घेतो तेवढी स्पष्ट भूमिका घेण्याची ताकद तुमच्यात तरी आहे का? हीच भूमिका दिशा सालीच्या प्रकरणात का घेत नाही तुम्ही? तिचा बाप तुमच्या दरवाजासमोर येऊन बोलतोय की तुम्ही आहात आरोपी म्हणून,” असा सवाल त्यांनी विचारला. त्यांनी प्रज्ञा पुरणेकर यांच्या हत्येचा निषेध करत, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना राजकीय पाठबळ देण्यास सरकारचा विरोध असल्याचे स्पष्ट केले.

शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली, ते म्हणाले की राऊत केवळ राजकारण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत, तर सरकार गुन्हेगारांना पकडण्यावर लक्ष देत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना भरघोस मदत देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे शिरसाट यांनी नमूद केले.

Published on: Oct 02, 2026 04:37 PM

Follow Us