Ashadhi Ekadashi 2025 : पाऊले चालती पंढरीची वाट… देहू नगरी वारकऱ्यांनी फुलली, राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या देहूत; बघा ड्रोननं नजारा
पुण्यातील देहूमध्ये संत तुकाराम महाराज पालखीचे आज प्रस्थान झाले आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळयाला आजपासून सुरुवात होत आहे. यावर्षीचा हा 340 वा पालखी सोहळा आहे.
पुण्यातील देहूमध्ये आज संत तुकाराम महाराजांचा 340 वा पालखी प्रस्थान सोहळा पार पडत आहे. यानिमित्ताने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे मुख्य मंदिर आकर्षक, विविध रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे तसेच ज्या पालखीमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत, त्या पालखीला देखील सजवण्यात आलंय.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या देहूत दाखल होऊ लागल्या आहेत. संत तुकाराम महाराजांचे मुख्य मंदिर असलेल्या शिरा मंदिर परिसरात वारकऱ्यांच्या दिंड्या दाखल झाल्यानंतर याच मंदिराला प्रदक्षिणा घालून वारकरी आपल्या आषाढी एकादशीच्या वारीची सुरुवात करत आहे. आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरूवात झाली आहे. सर्वत्र देहू नगरी ही वारकऱ्यांनी फुलली आहे तर आळंदीतही वारकऱ्यांची लगबग पाहायला मिळतेय.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

