Ashish Shelar : भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत, आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका
'भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड. आमचा गड म्हणून मिरवायचे. आता बघा कसे सगळे गडगडायला लागलेय. भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत,' आशिष शेलारांचे ट्विट.
मुंबई : आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर (Shivsena) टीका केली आहे. ते म्हणाले की, ”ज्या वरळीत सेनेच्या (?) खासदार, आमदार (MLA), माजी मंत्री, माजी महापौर आणि नगरसेवक असे नेत्यांचे थरावर थर आहेत, तिथे म्हणे पक्षाला द्यायच्या 100 रूपयांच्या शपथपत्राला “बळ” अपुरे पडतेय. दुसरीकडे भाजपाची जांबोरी मैदानातील दहिहंडी मुंबईकरांच्या प्रचंड प्रतिसादाने लक्षवेधी ठरतेय. भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड. आमचा गड म्हणून मिरवायचे. आता बघा कसे सगळे गडगडायला लागलेय. भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत. लवकरच. मुंबईकरच वरळीतून कोसळणाऱ्या थरांचा थरार निवडणूकीत “करुन दाखवतील” आमचं ठरलंय!!,’ असं ट्विट शेलार यांनी केलं होतं. यामुळे नवा वाद पेटला असून यावर शिवसेनेकडून देखील टीक करण्यात आली आहे.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
