अध्यक्षांनी साक्ष, पुरावे, प्रश्नोत्तरे सगळंच… थोड्याच वेळात शिवसेना पक्ष चिन्हावर सुनावणी, इतक्यात वकील असीम सरोदेंचं विधान चर्चेत
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान, कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून आपल्या अधिकार कक्षा ओलांडल्याचा आरोप सरोदे यांनी केला आहे.
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान, कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून आपल्या अधिकार कक्षा ओलांडल्याचा आरोप सरोदे यांनी केला आहे. आमदार अपात्रतेचा निर्णय घेताना राहुल नार्वेकर यांनी केवळ प्रथमदर्शनी तपासणी करून निर्णय घेणे अनपेक्षित होते, असे सरोदे यांनी म्हटले आहे. सरोदे यांच्या मते, नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पक्षाच्या नेतृत्वाची रचना पाहून तात्काळ निर्णय घ्यायला हवा होता. मात्र, त्यांनी न्यायालयाप्रमाणे विस्तृत सुनावणी आणि पुराव्यांची छाननी करण्याचा प्रयत्न केला, जो त्यांच्या भूमिकेसाठी योग्य नव्हता.
सर्वोच्च न्यायालयानेही या कृतीला संवैधानिक पाप (constitutional sin) संबोधले आहे, याकडे सरोदे यांनी लक्ष वेधले. इतकेच नाही तर साक्ष पुरावे, प्रश्नोत्तरे सगळंच तापणं गरजेचं होतं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने एबी फॉर्म दिले होते, हे स्पष्ट असतानाही नार्वेकरांनी अधिक चौकशी करून आपली भूमिका विस्तृत केल्याचे मत सरोदे यांनी व्यक्त केले.
Published on: Aug 20, 2026 02:59 PM
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का

