सर्वांना विश्वासात घेऊन लॉकडाऊनचा निर्णय होईल, अस्लम शेख यांची माहिती

लॉकडाऊनने प्रश्न सुटत नाही पण साखळी तरी तुटेल, असं अस्लम शेख म्हणाले.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:17 PM, 11 Apr 2021

मुंबई: मुंबईचे पालकमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्स सोबत आज बैठक होते आहे, अशी माहिती दिली. सध्या मुंबई,महाराष्ट्रात रुग्ण वाढत आहेत. कोरोना साखळी तोडणे गरजेचे आहे.सर्वांनी कोरोना साखळी तोडण्यासाठी एकमत करायला हवे. टास्क फोर्सने एक रुग्ण 25 लोकांना बाधा करू शकतो, असे मत आहे. यासाठी आपल्याला तयारी करावी लागेल. लॉकडाऊनने प्रश्न सुटत नाही पण साखळी तरी तुटेल, असं अस्लम शेख म्हणाले.