AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Assembly Election Results 2026 | आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, देवेंद्र फडणवीसांनी प्रचार केलेल्या दोन्ही मतदारसंघांमध्ये...

Assembly Election Results 2026 | आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, देवेंद्र फडणवीसांनी प्रचार केलेल्या दोन्ही मतदारसंघांमध्ये…

| Updated on: May 04, 2026 | 4:36 PM
Share

आसाम विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. नॉर्थ ईस्टच्या राजकारणाचे किंग हेमंता बिस्वा सरमा हेच ठरले आहेत. भाजपने पुन्हा एकदा आसाममध्ये विजयाची हॅटट्रिक मारणार असल्याचं चित्र आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये आसाममध्ये भाजप आघाडीला 95 तर काँग्रेस आघाडीला 28 जागा मिळताना दिसत आहेत.

आसाम विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. नॉर्थ ईस्टच्या राजकारणाचे किंग हेमंता बिस्वा सरमा हेच ठरले आहेत. भाजपने पुन्हा एकदा आसाममध्ये विजयाची हॅटट्रिक मारणार असल्याचं चित्र आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये आसाममध्ये भाजप आघाडीला 95 तर काँग्रेस आघाडीला 28 जागा मिळताना दिसत आहेत. या निकालामुळे राजकीय विश्लेषकही हैराण झाले आहेत. सगळ्यांचे डोळे आता अंतिम निकालांवर लागले आहेत. यादरम्यान महत्त्वाची बाब म्हणजे, आसाममध्ये भाजपचा विजय जवळपास निश्चित असताना एका वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आसाममधील दोन मतदारसंघांमध्ये स्टार प्रचारक होते. त्यांनी भव्य प्रचार रॅली काढली होती. या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपचा विजय झाला आहे. त्यामुळे हा महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्र्यांचाच करिष्मा आहे, असं सांगितलं जात आहे. या मतदारसंघांची नावे अनुक्रमे, दिब्रुगड आणि जोरहाट आहेत.

Published on: May 04, 2026 04:34 PM
Follow Us