AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Assam Flood | 6 जिल्ह्यातल्या 57 हजार नागरिकांना पावसाचा फटका

Assam Flood | 6 जिल्ह्यातल्या 57 हजार नागरिकांना पावसाचा फटका

| Updated on: May 17, 2022 | 10:03 AM
Share

रेल्वे रुळावरुन खाली ही ट्रेन घसरत असल्याची थरकाप उडवणारी दृश्यं समोर आली आहेत. सुदैवानं यावेळी ट्रेनमध्ये कुणीही नव्हतं. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. दरड कोसळून रेल्वे रुळांवर आली.

आसाम : आसाममध्ये मुसळधार (Assam Flood 2022) पावसानं कहर केलाय. आसाममधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत जालंय. अनेक गावांना पुरानं वेढा घातलाय. तर असंख्य कुटुंबांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. महापुरामुळे (Assam News) आसामचं मोठं नुकसान केलंय. या महापुरातील महाप्रलयकारी दृश्य (Assam Flood Video) समोर आली आहे. आसाममधील पुराचा फकटा रेल्वेलाही बसलाय. रेल्वे पुराच्या पाण्यात एखाद्या बोटीसारखी हेलखावे खात असल्याचं दिसून आलंय. रेल्वे रुळावरुन खाली ही ट्रेन घसरत असल्याची थरकाप उडवणारी दृश्यं समोर आली आहेत. सुदैवानं यावेळी ट्रेनमध्ये कुणीही नव्हतं. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. दरड कोसळून रेल्वे रुळांवर आली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात रेल्वे रुळांवर मातीचा ढिगारा आणि डोंगरावरुन कोसळणारं पाणी रेल्वे रुळांवर आलं होतं. याता थेट फटका रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या एक्स्प्रेसला बसलाय.

Published on: May 17, 2022 10:03 AM