'उठा उठा लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा, आपल्या...', शरद पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण

‘उठा उठा लाडक्या बहिणींनो दाजींला सांगा, आपल्या…’, शरद पवारांसमोर चिमुकल्याचं तुफान भाषण

| Updated on: Nov 05, 2024 | 2:55 PM

Purushottam Atole Speech : शरद पवार यांच्या उपस्थितीत युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ स्वाभिमान सभेचे शिरसुफळ येथे आयोजन करण्यात आले आहे. अशातच शिरसुफळ गावात एका चिमुकल्याने शरद पवार यांच्यासमोर जोरदार भाषण केले आहे. बघा व्हिडीओ

बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत होत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार असा समाना विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे काका विरूद्ध पुतण्याच्या होणाऱ्या या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार युगेंद्र पवार हे विधानसभेच्या रिंगणात आहेत. तर महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेसेच उमेदवार अजित पवार हे देखील विधानसभा लढवत आहेत. अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार यंदा अशी चुरशीची लढत होत आहे. दरम्यान, युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरले असून शरद पवार शिरसुफळ सुपा मोरगाव आणि सोमेश्वर या ठिकाणी जाहीर सभा घेणार असून बारामतीत व्यापारी मेळावा डॉक्टर मेळावा आणि वकील मेळावा शरद पवार घेणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ स्वाभिमान सभेचे शिरसुफळ येथे आयोजन करण्यात आले आहे. अशातच शिरसुफळ गावात एका चिमुकल्याने शरद पवार यांच्यासमोर तुफान भाषण केलंय. या 9 वर्षाच्या पुरुषोत्तम आटोळे याने शरद पवार यांच्यासमोर बोलताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय.

Published on: Nov 05, 2024 02:55 PM