एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल राहुल नार्वेकर यांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा अर्थ काय?
शिंदे यांचा गट अपात्र होणार की नाही. यावर राहुल नार्वेकर यांनी सूचक वक्तव्य केलंय. कायद्याने निर्णय घेणार असं म्हणताना बहुमत महत्वाचं असंत, असं त्यांनी म्हटलंय. ठाकरे आणि शिंदे गट या दोघांपैकी सभागृहात शिंदे यांच्याकडे बहुमत आहे.
मुंबई, १३ नोव्हेंबर २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सूचक वक्तव्य केले. कायद्यानुसार निर्णय घेताना बहुमत महत्त्वाचे आहे. असं वक्तव्य केल्यानंतर राहुल नार्वेकर यांना नेमकं काय सुचवायचंय अशी चर्चा आता सुरू झाली आहे. शिंदे यांचा गट अपात्र होणार की नाही. यावर राहुल नार्वेकर यांनी सूचक वक्तव्य केलंय. कायद्याने निर्णय घेणार असं म्हणताना बहुमत महत्वाचं असंत, असं त्यांनी म्हटलंय. ठाकरे आणि शिंदे गट या दोघांपैकी सभागृहात शिंदे यांच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे. दरम्यान, या प्रकरणावर काय निर्णय घ्यायचा याचा फैसला ११ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपावला. मात्र ६ महिन्यात यावर निर्णय न झाल्याने ठाकरे गट पुन्हा कोर्टात गेलेत आणि निर्णय कधी घेणार याचं वेळापत्रक नार्वेकर यांनी न दिल्यानं आता कोर्टानं ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश दिलेत.