Ulhasnagar | उल्हासनगरात भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना काळं फासलं

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर अटक करण्यात आली आहे. राणे यांच्याविरोधात संपूर्ण राज्यभरात असंतोषाचं वातावरण असताना उल्हासनगरात ही एका भाजप नगरसेवकाला मारहाण करण्यात आली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Aug 24, 2021 | 5:44 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं अंगलट आलं असून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या वादाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. उल्हासनगरात ही एक मोठी घटना घडली आहे. नारायण राणे यांना अटक झालेली असताना शिवसेनेविरोधात बोलणाऱ्या भाजपा नगरसेवकाला शिवसैनिकांनी थेट काळं फासत मारहाण केली आहे. या घटनेनंतर उल्हासनगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रदीप रामचंदानी असं मारहाण झालेल्या भाजपा नगरसेवकाचं नाव आहे. ते उल्हासनगर महानगरपालिकेचे स्वीकृत सदस्य आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार रामचंदानी हे आज (24 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास उल्हासनगर महानगरपालिकेच्या बाहेर आले होते. यावेळी अचानक 8 ते 10 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांना खाली पाडून मारहाण केली. या मारहाणीनंतर रामचंदानी यांच्या तोंडाला काळं फासलं. मारहाण करण्यासाठी आलेले कार्यकर्ते गळ्यात शिवसेनेचे मफलर घालून आल्याचं सांगण्यात येतंय. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये हा सर्व घटनाक्रम स्पष्टपणे दिसतोय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें