Atul Save : ऊस गळीत हंगाम यंदा लवकर सुरू करण्याविषयी मुख्यमंत्र्यांकडे विनंती, अतुल सावे यांची माहिती
एक नवीन अॅप (App) तयार करण्यात आले असून त्यात आपले रजिस्ट्रेशन करायचे आहे. जवळच्या कारखान्यासाठी नोंद करायची आहे, असे अतुल सावे म्हणाले.
औरंगाबाद : यावर्षी गाळप हंगाम लवकर व्हावा. 15 सप्टेंबरला बैठक घेऊन 1 ऑक्टोबरपासून गाळप सुरू करावा, असे मंत्री अतुल सावे (Atul Save) म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. गेल्या हंगामात शिल्लक ऊस (Sugercane) आणि गाळपाचे गणित बिघडले होते. गाळप वाढविण्यासाठी तीन शिफ्टमध्ये कारखाने चालविण्यात आले. ऊसतोडीसाठी माणसे नव्हती. त्यामुळे शेजारच्या जिल्ह्यातून ऊसतोड यंत्र मागवून घेण्याचे कारखानदारांना सुचविले होते. ऊस संपेपर्यंत कारखाने बंद करायचे नाहीत, असे आदेश विभागीय प्रशासनाने जारी केले होते. दरम्यान, एक नवीन अॅप (App) तयार करण्यात आले असून त्यात आपले रजिस्ट्रेशन करायचे आहे. जवळच्या कारखान्यासाठी नोंद करायची आहे, असे अतुल सावे म्हणाले.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

