AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | सनई-चौघड्यांएवजी दगडफेकीनं लग्न चर्चेत

Special Report | सनई-चौघड्यांएवजी दगडफेकीनं लग्न चर्चेत

| Updated on: Jun 18, 2022 | 10:29 PM
Share

या दगडफेकीमुळे नवरदेवाकडील 7 ते 8 जण नातेवाईकांना दुखापतही झाली आहे.या घटनेची सर्व माहिती नातेवाईकांनी पोलिसांना देत आपला जीव वाचवत नवरदेवाकडील नातेवाईकांनी थेट मुंबई गाठली.

मुंबईमधील विक्रोळी विभागातील नवरदेवाचे वऱ्हाड औरंगाबादमधील गांधेली गावात नवरीकडे लग्नसोहळ्यासाठी गेले होते. दोन्हीकडील पाहुण्यांच्या उपस्थित थाटामाटात नवरानवरीवर अक्षताही पडल्या. मात्र काही वेळेतच काही तरी कारण घडले आणि वादाची ठिणगी पडली. नवरदेवाकडील व नवरीकडील नातेवाईक यांच्यामध्ये वाद सुरू झाला आणि तो इतका विकोपाला गेला की, नवरदेवाकडील आलेल्या वऱ्हाडी मंडळींची गाडीही फोडण्यात आली. नवरदेवाकडील पाहुण्यांच्या गाडीवरच दगडफेक करून औरंगाबादकर थांबले नाहीत त्यांनी थेट दगडफेक करायला सुरुवात केली. या दगडफेकीमुळे नवरदेवाकडील 7 ते 8 जण नातेवाईकांना दुखापतही झाली आहे.या घटनेची सर्व माहिती नातेवाईकांनी पोलिसांना देत आपला जीव वाचवत नवरदेवाकडील नातेवाईकांनी थेट मुंबई गाठली.

Published on: Jun 18, 2022 10:29 PM