Aslam Shaikh | अविघ्न पार्क आग दुर्घटनेप्रकरणी अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश : अस्लम शेख
मुंबईतील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आग लागली.
मुंबईतील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आग लागली. जीव वाचवताना एका रहिवाशाचा खाली पडून मृत्यू झाला. त्यानंतर, इमारतीचे जे कोणी मॅनेजमेंट आहेत, ते आग प्रकरणी प्रथमदर्शनी दोषी दिसत आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली. दरम्यान, अविघ्न पार्क आग दुर्घटने प्रकरणी अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी काय सांगितलं?
अग्निशमन दलाचे जवान शिडी लावून चढेपर्यंत अरुण तिवारी याचा हात निसटला आणि तो खाली पडला. बहुतेक 19 व्या मजल्यावर फर्निचरचं काम सुरु होतं. तिथे ठिणगी उडून आग लागल्याची माहिती आहे. सोसायटीतील रहिवासी सांगतात की त्यांची वॉटर सिस्टम चालू नव्हती. दरवेळी महापालिका काय करेल, सगळ्या सिस्टम आहेत. पण सिस्टम वर्किंगमध्ये ठेवली नाही. इमारतीचे जे कोणी मॅनेजमेंट आहेत, ते प्रथमदर्शनी दोषी दिसत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
Published on: Oct 22, 2021 05:33 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
