Prahar Protest : प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक; बच्चू कडूंच्या समर्थनार्थ मंत्रालयाबाहेर आंदोलन
Bachchu Kadu Hunger Strike : प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन केलं आहे. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धरपकड झाली आहे.
बच्चू कडू हे मागील 4 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. शेतकरी, दिव्यांग, कामगारांचे प्रश्न सरकारने लवकरात लवकर सोडवावेत यासाठी ते उपोषण करत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ आज प्रहार संघटनेच्या काही कार्यकर्त्यांच्यावतीनं मंत्रालयाबाहेर गार्डन गेटवर आंदोलन करण्यात आलं. यात आंदोलनात अनेक अपंगांचा समावेश होता. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धरपकड झाली आहे.
दरम्यान, बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गुरूकूंज मोझरी येथे गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. मात्र या आंदोलनाची दखल अद्यापही शासनाने घेतलेली नाही. त्यामुळे बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ आज प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन केलं आहे. त्यावर आता प्रशासन काय भूमिका घेईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?

