Bachchu Kadu : बच्चू कडूंना बावनकुळेंचा फोन, बैठकीस तयार पण… बच्चू कडूंनी केली एकच मागणी
नागपुरात बच्चू कडूंनी शेतकरी कर्जमाफीसाठी महा एल्गार मोर्चा पुकारला आहे. त्यांनी सरकारला दुपारी १२ नंतर रेल्वे रोकोचा अल्टिमेटम दिला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोनवरून संपर्क साधला असला तरी, कडूंची मागणी आहे की, बैठकीसाठी सरकारने मुंबईऐवजी नागपुरात यावे.
नागपुरात बच्चू कडूंनी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी विराट ट्रॅक्टर मोर्चा काढत महा एल्गार आंदोलन सुरू केले आहे. जामठा चौकात, नागपूर-जबलपूर महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू असून, यामुळे चार महामार्ग जाम झाले आहेत. कडूंनी सरकारला दुपारी १२ नंतर रेल्वे रोको करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी नागपूर-वर्धा महामार्गावर बॅरिकेटिंग केले असून, मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी, डीसीपी सातव आणि एसीपी नरेंद्र हिवरे यांनी बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली.
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांना फोन करून बैठकीसाठी तयार असल्याचे सांगितले. मात्र, कडू यांनी मुंबईऐवजी नागपुरातच बैठक घेण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, आंदोलन सोडून मुंबईला येणे शक्य नाही आणि पूर्वीच्या बैठकांमधूनही ठोस निर्णय झाले नाहीत.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

